Home क्राईम अजिंठा चौफुलीजवळून तरूणाची दुचाकी लांबविली

अजिंठा चौफुलीजवळून तरूणाची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौफुलीवरील बाफना यांच्या गोडावून समोरून एकाची दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जयंत प्रकाश बोरोले (वय-३१) रा. कानळदा ता.जि.जळगाव हे आपल्याक कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ४ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास (एमएच १९ बीए ५१२१) क्रमांकाच्या दुचाकीने आले. त्यांनी अजिंठा चौफुलीवरील आर.सी.बाफना गोडावूनच्या समोर पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर बुधवार १३ जुलै रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.


Protected Content

Play sound