अमळनेर प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान करून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी अमळनेर विभाग यांच्याकडे केली.
याबाबत अमळनेर शिवसैनिकांनी येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. दरम्यान अमळनेर रेस्ट हाऊस जवळील महाराणा प्रताप चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्याबद्दल केलेल्या अपशब्दचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.