महाज्योतीच्या माध्यमातून यंदा २० हजार मुलांना प्रशिक्षण-वडेट्टीवार

 

 

नागपूर : प्रतिनिधी । महाज्योती संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकार यंदा २० हजार मुलांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे.

महाज्योतीच्या माध्यमातून या वर्षी २० हजार मुलांना प्रशिक्षण देणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी मागास प्रवर्गातील २० हजार मुला-मुलींना सरकार प्रशिक्षण देणार आहे. महाज्योतीच्या जहिराती आता सुरु झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी २० हजार मुला-मुलींना प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण विविध क्षेत्रांसाठी देण्यात येईल. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुलांना रोजगार उपलब्ध होतील, अशी पावलं आम्ही उचलत आहोत. भटक्या विमुक्तांसाठी जे जे करता येईल ते ते आम्ही सगळं करु, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

भटक्या विमुक्त समाजातील मुलांना जेईई, नीट परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार आहे तसंच १० हजार मुलांना पोलीस नोकरीसाठी प्रशिक्षण देणार असल्याचंही वडेट्टीवर यांनी सांगितलं. भटक्या विमुक्त जातीतील मुलांचं प्रशासनातील प्रमाण अतिशय कमी आहे. याचाच विचार करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणून एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांसाठीची तयारी त्यांच्याकडून करुन घेणार आहे. त्यासाठी आम्ही ५०० मुलांची निवड करणार आहोत. त्यासाठीचा सगळा खर्च राज्य शासन करणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

 

Protected Content