जयकिसनवाडीतील माध्यमिक शिक्षक पतपेढीत ‘शिक्षक दरबार’ कार्यक्रम(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील माध्यमिक शिक्षक पतपेढीत मंगळवारी शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी उपस्थित जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आले. या शिक्षक दरबार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. दराडे, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, वेतन अधिक्षक संजय चव्हाण, उपशिक्षणाधिकारी देवांग, वेतन अधिक्षक शर्मा, प्रमोद कोल्हे, संजय चव्हाण, नरेंद्र सपकाळे, नाना पाटील, गजानन निळे यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात मागील सभेच्या इतिवृत्तावाचून चर्चाने करण्यात आली. यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ ओळखपत्र देणे, वैद्यकीय बिलांना तात्काळ मंजूरी देणे, पीएफ फंडाचा परतावा बिलांना मंजूरी मिळावी याबाबत वार्षीक स्लीप देण्यात यावी, जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठता यादी अद्यावद करावी, वरिष्ठ व निवड श्रेणी मिळावी, पुरवणी देयके तातडीने मंजूर करावे, यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/897566117567164

Protected Content