पुरोगामी निर्णय घेणार्‍या काटे दाम्पत्याचा मराठा समाजातर्फे सत्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकताच काटे कुटुंबातील तरूणाने विधवा वहिनीशी विवाहाचा निर्णय घेतला असून या दाम्पत्याचा मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला.

कोळपिंप्री (ता पारोळा) येथील राहुल विनोद काटे (वय-३१) या एका दिराने आपल्या विधवा वहिनी अनिता काटे (वय-२८) यांच्याशी विवाह करून तिच्या जीवनाला आधार दिला अन विशेष आठ महिन्याचा मुलगा मयंक, जुळ्या मुली विद्या व वैभवी या तीन मुलांसाठी बाप होऊन संपूर्ण जबाबदारीही घेतली आहे. काटे परिवारातील या पुरोगामी विचारांनी मराठा समाजात एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या आदर्श विवाहाच्या पार्श्वभूमीवर येथील तालुका मराठा समाजाच्या वतीने नवदांपत्यासह कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

माजी आमदार डॉ बी. एस. पाटील, बाजार समितीच्या माजी प्रशासक तिलोत्तमा पाटील, महिला कॉंग्रेस च्या जिल्हाध्यक्षा सुलोचना पाटील, पदमजा पाटील, तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या हस्ते राहुल काटे, अनिता काटे, राहुलचे वडील विनोद काटे व चिमुकल्या चा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाचे उपाध्यक्ष संजय पाटील व राजेंद्र देशमुख, कोषाध्यक्ष महेंद्र शालीग्राम बोरसे, सहसचिव प्रविण श्रीराम पाटील, संचालक चंद्रकांत प्रभाकर काटे, जयप्रकाश रामदास पाटील, शिवाजी मोहन पाटील, मनोहर छबु पाटील, संजय पुनाजी पाटील, कैलास रामदास पाटील, स्वप्नील वसंतराव पाटील, गौरव उदय पाटील, संजय शालीग्राम पाटील, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे, सचिव उमेश काटे, स्वप्ना विक्रांत पाटील ,धनराज पाटील, कांतीलाल काटे, रवींद्र काटे, प्रतिभा सुर्यवंशी, साधना पाटील, रेखा पाटील, सविता अहिरे आदीसह मराठा समाजाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ बी. एस. पाटील यांनी सांगितले की, कोळपिंप्री येथे काटे परिवारात झालेला आदर्श विवाह हा सद्यस्थितीत काळाची गरज असल्याचे सांगितले. जयवंतराव पाटील यांनी सांगितले की, विधवा वहिनीसह तीन चिमुकल्याना दिराने दिलेला आधार कौतुकास्पद असून मराठा समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तिलोत्तमा पाटील यांनी विधवा महिलांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकत राहुल काटे या तरुणाने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. यावेळी उमेश काटे व राहुल काटे यांनीही मनोगत व्यक्त केले. समाजाचे उपाध्यक्ष संजय कृष्णा पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक संजय पुनाजी पाटील यांनी आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content