उष्माघाताने वावडद्याच्या उपसरपंचाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वावडदा येथील उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

वावडदा येथील उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील यांनी शुक्रवारी दिवसभर आपल्या शेतात काम केले. यानंतर रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचार सुरू असतांनाच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

वावडदे शिवारात बिबट्याची दहशत असून यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे कमलाकर पाटील यांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबातील लोकांना घेऊन शेतात काम केले. मात्र यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सध्या कडाक्याचे उन असल्यामुळे आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे असा सल्लादेखील डॉक्टरांनी दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content