मेहरूण परिसरातील अतिक्रमण सोमवारी पोलीस बंदोबस्तात काढणार

atkraman

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण भागातील अक्सा नगर, मास्टर कॉलोनी, मस्जिद उमर या परिसरातील नागरिकांनी काल जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या भागातील अतिक्रमण व इतर समस्यांचे निवारण करण्याची विनंती केली होती. यानुसार आज महापालिका आयुक्तांनी सकळी ८.३० वाजता या परिसराची पाहणी केली असता त्यांना नागरिकांच्या तक्रातरीत तथ्य आढळलेल्याने हे अतिक्रमण सोमवार ८ एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार आहे.

निवेदनात नागरिकांनी नागोरी चौका ते शाह यांच्या चक्की र्यंतचा १२ मीटर रोडवर बेकायदेशीर अतिक्रमित दुकाने आणि मटन विक्री सुरु असल्याची तक्रार केली होती. रस्त्यावर मटन विक्री होत असल्याने परिसरात दुर्गंधी येत असते. याबरोबर गटारीसुद्धा कचऱ्याने भरलेल्या असतात. या भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. हे मोकाट कुत्रे गटारीत व पाण्याच्या कुंड्यात तोंड मारत असल्याने संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. ही मोकाट कुत्री आता लहान मुलांवर, वृद्धांवर, महिलांवर हल्ला करीत आहेत. महापालिकेने मागील वर्षभरापासून या मोकाट कुत्र्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. तरी अतिक्रमण त्वरित काढावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. यानुसार महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी सकाळी ८.३० वाजता या भागाची पाहणी केली. यावेळी त्याच्या सोबत अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान व मनपा कर्मचारी होते. या पाहणीत अतिक्रमण काढतांना पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता भासणार असल्याचे जाणवले असल्याने सोमवार ८ एप्रिल रोजी पोलीस बंदोस्तात हे अतिक्रण काढण्यात येणार आहे.

Add Comment

Protected Content