सारबेटे खुर्दच्या तरूणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सारबेटे खुर्द येथील तरूणाने आज टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपविली.

तालुक्यातील सारबेटे खु. येथील तुषार भावराव देवरे (वय ३३)असे नाव या तरुणाचे असून त्याने आज दुपारच्या तीन वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. तुषार देवरे हा अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील माध्यमिक विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत होता. तो वडिलांच्या जागेवर अनुकंप तत्ववर कार्यरत होता.त्याच्या आत्महत्याचे कारण समजु शकले नसून त्यांच्या पाच वर्षाची एक तर दुसरी तीन वर्षाची मुलगी दोन मुली असून पत्नी, आई, दोन बहीण असा परिवार आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात स्टेशन मास्टर विलास पाटील यांच्या खबरिवरून याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुनील पाटील हे करीत आहे.

Protected Content