ग्रंथदिंडीसाठी अमळनेर नगरी सजणार रांगोळ्यांनी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने शुक्रवार, 2 फेब्रुवारी सकाळी 7.30 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीच्या व सर्व सारस्वतांच्या स्वागतानिमित्ताने अमळनेर नगरातील सुमारे 20 चौक रांगोळ्यांनी सजणार आहेत. त्यासाठी सुमारे 15 क्विंटल रांगोळ्यांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती रांगोळीकार नितीन भदाणे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षापासून नितीन भदाणे हे अमळनेर शहरासह विविध ठिकाणी आकर्षक, सुंदर व मनमोहक अशा रांगोळ्या काढत असतात. मुख्य सभामंडपाबाहेर रोज नवी रांगोळी काढण्यात येणार आहे, तर परिसरही विविध रांगोळ्यांनी सजवणार आहे.

ग्रंथदिंडीस सकाळी 7.30 वाडी चौकातून सुरवात होणार आहे. तेथून दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक, स्‌‍‍ टेट बँक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या चौकात विविध रांगोळी काढण्यात आलेल्या आहेत.या रांगोळ्या काढण्यासाठी 8 क्विंटल पांढरी रांगोळी, तर 5 क्विंटल रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी नितीन भदाणे, गोलू सोनार, चेतन धनगर, किरण चौधरी, किशोर भदाणे यांचे सहकार्य मिळत आहे.

Protected Content