पाडळसेर येथे मरीआई यात्रोत्सवाचे आयोजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कळमसरे येथून जवळच असलेल्या पाडळसरे येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. पाडळसरे येथे अनेक वर्षापासून मरिआईची यात्रा भरावयास प्रारंभ झाला. येथील माजी उपसरपंच भिला साळुंखे हे व गावातील ग्रामस्थांच्या मदतीने ही यात्रा भरावयास सुरुवात केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाडळसरे या गावाचे नवीन पुनर्वसन म्हणून समायोजन देखील झाले आहे.

तापी नदी काठावर वसलेले नाटेश्वर महादेव मंदिर व गावात असलेलं मरीआई मातेचे मंदिर याच जुन्या गावी स्थित असल्यामुळे आजही यात्रा याच ठिकाणी संपन्न होत असते. हे विशेष.गावातील इडा पीडा दूर सारणाऱ्या मरीआईच्या या यात्रोत्सवात गावातील महिला, अबाल वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होत असतात. गावातील व परिसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी सुकलाल भाऊ बोराडीकर यांचा लोक नाट्य तमाशा मंडळ कार्यक्रम होणार आहे. दरम्यान गुरूवारी होणाऱ्या यात्रोत्सव काळात हॉटेल्स, झुले पाळणे, खेळणी दुकाने, संसारोपयोगी साहित्य दुकानदार यांनी दुकाने थाटावी तसेच यात्रा काळात शांतता राखावी असे आवाहन पाडळसरे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content