चिनावल-वडगावाला जोडणाऱ्या पुलाचे आ. शिरीष चौधरींच्या हस्ते भूमिपूजन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार शिरीष चौधरी यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच विविध विकास कामांच्या निधी अंतर्गत एकूण १० कोटी ३४ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्ते काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृह बांधकाम, पुल बांधकामाची कामे तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणार असल्याने दीर्घकाळापासूनची समस्या सुटेल असे ग्रामस्थांनी सांगितले. निधी अंतर्गत

१) मौजे रोझोदा, ता. रावेर येथे चिमण धांडे यांच्या घरापासून ते वि.का.सो. गेटपर्यंत ते मधुकर महाजन यांच्या घरापासून ते पंडीत धांडे यांच्या घरापर्यंत कॉक्रीटीकरण – ६ लक्ष

२) मौजे चिनावल, ता. रावेर येथे मुकुंदा भंगाळे ते किरण महाजन यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक – ६ लक्ष

३) प्रविण पंढरीनाथ वायकोळे यांच्या घरापासून अमोल बढे यांच्या घरापर्यंत काँक्रीटीकरण – १० लक्ष

४) मौजे विवरे खुर्द, ता. रावेर येथे सुदर्शन चौधरी यांच्या घरापासून संतोष लहानू महाजन यांच्या घरापर्यंत कॉक्रीटीकरण – ५ लक्ष

५) ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर सामाजिक सभागृह बांधकाम – १५ लक्ष

६) मौजे विवरे बु, ता. रावेर येथे बाजार चौक ते धनगर वाड्यापर्यंत पेव्हर ब्लॉक – ९ लक्ष

७) अंकलेश्वर – ब-हाणपूर राज्य महामार्ग क्र. ६ ते जागृत हनुमान मंदिरा कडे जाणा-या रस्त्याचे कॉक्रीटीकरण – १० लक्ष

८) दिपक महाजन यांच्या घरापासून ते शे नईम शे रहीम यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण – ७ लक्ष

९) शे. नईम शे. रहीम यांच्या घरापासून ते शे. रफीक शे. सुपडू यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण – १५ लक्ष

१०) फैजपुर-रोझोदा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (५ किमी.)- ११४ लक्ष

११) फैजपुर-रोझोदा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२ किमी.)- ५० लक्ष

१२) चिनावल-वडगाव ला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करणे – ७८७.५० लक्ष

या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. गावातील विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ राजेंद्र पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद जफर मोहंमद, योगेश पाटील,  रमेश महाजन,  विजय महाजन, डॉ मिलिंद वायकोळे, धनंजय चौधरी,  दिपक धांडे,  गुणवंत टोंगळे,श्री होमकांत सरोदे, रवींद्र चौधरी, कमलाकर पाटील, बापू पाटील, दामोदर महाजन, सावखेडाचे सरपंच युवराज कराड, रोझोदाचे सरपंच पुष्कर फेंगडे, उपसरपंच चेतन भारंबे, चिनावलचे सरपंचा ज्योती भालेराव, उपसरपंचा शाहीन बी जाबिर, वडगावचे सरपंच धनराज पाटील, विवरे खुचे सरपंचां स्वरा पाटील, विवरे बुचे सरपंच युनूस तडवी, उपसरपंच विनोद मोरे, संजू जमादार, ग्रामपंचायत सदस्य हेमांगी भंगाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी आदी उपस्थित होते.

Protected Content