पुण्यात पाटलांच्या प्रचारासाठी विनाहेल्मेट बाईक रॅली

pune 1

 

पुणे प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभुमीवर आज शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. मात्र, 100 हून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वार सहभागी झाले असून त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यांच्यावर कारवाई केली जाईल असे वाहतूक पोलीसांनी सांगितले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाची उमेदवारी घोषित झाल्यापासून ते प्रचाराच्या रॅलीपर्यंत अनेक कारणामुळे सतत ते प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहेत. कोथरूड भागात सकाळच्या सुमारास भव्य दुचाकी रॅली काढल्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. पुण्यात १ जानेवारी पासून विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यावर शहरातील विविध संघटनांकडून आंदोलने करीत कारवाईचा निषेध देखील करण्यात आला. त्यातच चंद्रकांत पाटील यांच्या रॅलीत चक्क दुचाकी चालक विनाहेल्मेट सहभागी झाल्याने सर्वसामान्य पुणेकर आता कारवाई होणार का असा प्रश्न सोशल मीडियावर विचारत आहेत.

Protected Content