मन्यारखेडा येथे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा

Dharangaon news

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदार संघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा मन्यारखेडा येथे प्रचार दौरा काढण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे स्वागत केले.

सदर प्रसंगी चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासारखा शेतकऱ्यांमधील नेता हवा, असा सूर यावेळी गावकऱ्यामधून उमटला. सदर प्रसंगी संजय भोळे, गणेश पाटील, प्रकाश बारी, सुदाम राजपूत, अरुण सपकाळे, मिलिंद चौधरी, अरुण बऱ्हाटे, ईश्वर मराठे, मनोज इंगळे, दीपक ढाके, नकुल चौधरी, दिगंबर खाचणे, सुनिल अत्तरदे, मण्यारखेडा गावचे सरपंच, ग्रा.पं. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content