पातोंड्यातील विकासकामांचे ना. अनिल पाटील यांच्याहस्ते भूमिपुजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथे १ कोटी ८४ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा भुमिपुजन सोहळा मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला.

मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने सदर कामे मंजुर झाली आहेत.या सोहळ्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, कामगार नेते तथा दापोरीचे माजी सरपंच एल.टी. पाटील, कृ.उ. बा.समितीचे सभापती अशोक आधार पाटील, संचालक नितिन पाटील, समाधान धनगर, विजय पाटील, पातोंडा चे सरपंच भरत बिरारी, वि.का.सो.चेअरमन सुनिल पवार, मा.सरपंच महेंद्र पाटील सर, सौ.शितल पाटील, सौ.प्रतिभा शिंदे, उपसरपंच दिलिप बोरसे, ग्राम पंचायत सदस्य संदिपराव पवार, मा.उपसरपंच नितीन पारधी, प्रविण बिरारी, रमेश संदानाशिव, प्रविण लाड, नाना सोनवणे, विजय मोरे, अमित पवार, मंगेश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या कार्यक्रमात ग्रामविकास विभाग तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत ग्राम दैवत माहेजी देवी मंदीर येथे भक्त निवास बांधकाम करणे, रक्कम अंदाजित ४७ लाख रूपये, जिल्हा नियोजन समिती तिर्थक्षेत्र अंतर्गत माहेजी देवी मंदीर येथे स्वच्छता गृह बांधकाम करणे रक्कम अंदाजित १२ लाख रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास अंतर्गत बौद्ध विहार बांधकाम करणे रक्कम अंदाजित २०.०० लाख रुपये, मुलभूत सुविधा २५१५ अंतर्गत गाव दरवाजा बांधकाम करणे रक्कम २०.०० लाख रुपये, मुलभूत सुविधा २५१५ अंतर्गत शेत रस्ता खडीकरण करणे रक्कम २०.०० लाख रुपये, स्थानिक आमदार निधीतुन चौक सुशोभिकरण करणे रक्कम १०.०० लाख रूपये, जिल्हा नियोजन समिती जनसुविधे अंतर्गत चौक सुशोभिकरण करणे रक्कम १०.०० लाख रुपये.असे एकुण १ कोटी ८४ लक्षच्या कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

Protected Content