मंगरूळमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय पुन्हा एकदा जुन्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हास्याने, गप्पांनी आणि आठवणींनी गजबजले.इयत्ता दहावी सन 2005-06 मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल एकोणावीस वर्षांनंतर शाळेत पुन्हा पाऊल ठेवत स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून भूतकाळातली आठवणी नव्याने अनुभवल्या.

या भावनिक व आनंददायी स्नेहमेळाव्याचे आयोजन 25 मे रोजी, रविवारच्या दिवशी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे ऋण मान्य करत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फुलांचे बुके आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला. यावेळी वातावरणात एक अनोखी उर्जा जाणवत होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्था चालक श्रीकांत अनिल पाटील, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश पाटील होते. तर संजय पाटील, प्रभुदास पाटील, अशोक सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शितल पाटील, सीमा मोरे, पी.आर. पाटील, मनोज पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.

स्नेहमेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपआपला परिचय देताना शाळेतील गमतीदार प्रसंग, शिक्षकांच्या आठवणी, आणि वर्गातील खट्याळ क्षण शेअर करत हसत हसत डोळ्यांत पाणी आणले. एकमेकांना भेटून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती पाटील यांनी प्रभावीपणे केले, तर शाळेची माजी विद्यार्थीनी व कवयित्री कल्पना देवरे यांनी आपल्या चारोळ्या व कवितांच्या माध्यमातून उपस्थितांचे मन जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ईश्वर भदाणे, रावसाहेब पाटील, प्रदीप पाटील, गुलाब भदाणे, कुंदन वाघ, शरद पाटील, नगराज पाटील, योगेश पाटील, सचिन भदाणे, नरेंद्र बागुल, बापू धनगर, गणेश पाटील, निंबा पाटील, जितेंद्र पाटील, सतीश बागुल, नारायण पाटील आणि सहकाऱ्यांनी मोठे योगदान दिले. पुन्हा एकदा भेटू या आशावादासह हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला.

Protected Content