रोहिणी खडसेंच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांना मिळाला दिलासा !

0
13

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या प्रयत्नांनी बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रोहिणी खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार बोदवड, नाडगाव, शेलवड व साळशिंगी या महसूल मंडळातील आंबिया महारासाठी केळी पिकाला तर साळशिंगी (करंजी) महसूल मंडळाचा मृग बहारासाठी लिंबू पिकात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना विम्याचा थेट लाभ मिळणार आहे.

या संदर्भात रोहिणी खडसे यांनी 28 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे या मंडळांचा विमा योजनेत समावेश करण्याची लेखी मागणी केली होती. याचप्रमाणे सन 2024-25 च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तात्काळ विमा मदत मिळावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. या मागणीनंतर द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने 2,15,961 शेतकऱ्यांच्या विमा दावा अर्जांना मंजुरी देत 55.45 कोटींचा विमा निधी मंजूर केला, ज्यापैकी 54 कोटींचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

यासंदर्भात बोलताना ॲड. रोहिणीताई खडसे म्हणाल्या, “शेतकऱ्यांच्या अडचणींवर मी शासन स्तरावर सातत््यााने आवाज उठवत्ो. शेतकऱ्यांच्या हितासाठी वस्त्ूानिष्ठ मागण्या केल्यास शासनही सकारात्मक प्रतिसाद देते, याचे हे उदाहरण आहे. विमा मंजुरी आणि नव्या पिकांचा योजनेत समावेश झाल्याने हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.