नंदूरबारमध्ये अंगणवाडीतील पोषण आहारात आळया

नंदुरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नंदुरबार येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या आढळल्याची घटना समोर आली. नंदुरबारतील शहादा तालुक्यामधील मुबारकपूर येथील अंगणवाडीत ही घटना आहे. मात्र, यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुबारकपूर गावातील अंगणवाडीत मंगळवारी बालकांना पोषण आहाराचे पाकीट वाटण्यात आले. मात्र, या पोषण आहारात अळ्या आढळल्याची माहिती गावातील सरपंच ताईबाई राजेंद्र अहेर यांना मिळली. यानंतर अहेर यांनी तातडीने अंगणवाडीत जाऊन सर्व पोषण आहाराची प्रत्यक्ष पाहणी केली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट म्हसावद बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला संपर्क करुन अंगणवाडीतील प्रकार सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे, अंगणवाडीतील मदतनीस महिलेने अळ्या असलेला हाच पोषण आहार शिजवण्यासाठी घेतला होता. मात्र, त्यांनी निरखून पाहिले असता त्यामध्ये आळ्या आढळून आल्या. पोषण आहारात आळ्या आढळून आल्याची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अंगणवाडी धाव घेऊन संताप व्यक्त केला.

Protected Content