वाढदिवशी दारूच्या नशेत खाडीत पोहताना बुडल्याने तरूणाचा मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील जुईनगर येथील रहिवासी राज संजय सांगरे या तरुणाचा मंगळवारी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मित्रासोबत वेळ घालवताना बुडून मृत्यू झाला. नेरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडीत नियमित पोहणारा सांगरे दारूच्या नशेत असल्याने तो पाण्यात बुडाला.

जुईनगर सेक्टर-२३ मधील परशुराम सोसायटीत डिलिव्हरी बॉय सांगरे हा आई-वडिलांसोबत राहत होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगरे आणि त्याच्या मित्राने दुपारी तीनच्या सुमारास जुईनगर सेक्टर-२४ मधील मंगलप्रभू रुग्णालयाजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पार्टी करण्याचे ठरविले. दोघांनी खड्ड्यात उडी मारून पोहायला सुरुवात केली, पण पाण्याचा अंदाज न आल्याने सांगरे बुडून मृत्यू झाला.

Protected Content