कवी संजय हिंगोणेकर यांच्या ‘तूम्ही काहीही म्हणा..!’ या काव्यसंग्रहाचे शुक्रवारी प्रकाशन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रागतिक विचारमंच जळगाव यांच्या वतीने शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ वाजता मू.जे.महाविद्यालयात कवी प्रा.संजय हिंगोणेकर यांच्या ‘तूम्ही काहीही म्हणा..!’ या अथर्व प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या काव्यसंग्रहाचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे व यावेळी युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी डॉ. विरा राठोड याप्रसंगी काव्यसंग्रहावर भाष्य करतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द कवी शशिकांत हिंगोणेकर, प्रा. देवेंद्र इंगळे व अथर्व प्रकाशनचे संचालक युवराज माळी उपस्थित राहणार असून प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. या प्रकाशन सोहळ्यास शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुकुंद सपकाळे आणि अविनाश तायडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content