दुसऱ्या दिवशीही एसटीचे चार कर्मचारी आढळले कोरोना बाधित (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची दोन दिवशीय कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या  शिबिराच्या दुसऱ्या दिवशी रविवारी १०५ कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता आज पुन्हा ४ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

कोरोना तपासणी कार्यक्रमाला सुरुवात आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. जळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. पहिल्या दिवशी एकूण तीनशे दहा कर्मचाऱ्यांच्या तपासणीअंती चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी एकूण १०५ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी परत चार कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले. काल व आजच्या तपासणीत एकूण आठ कर्मचारी पॉझिटिव्ह  आढळून आले आहेत. या पॉझिटिव्ह  असलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी स्थानक प्रमुख मनोज तिवारी, गोपाळ पाटील, प्रविण कुमावत, मनोज सोनवणे, आर.  आर. शिंदे, वाहतूक नियंत्रक शिरीष चौधरी यांनी सहकार्य केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/283940113200073

 

Protected Content