पिडीत कुटुंबियाला न्याय न मिळाल्याने रिपाइंतर्फे निदेर्शने (व्हिडीओ)

फैजपूर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बोरगाव येथील हत्याकांड प्रकरणातील पिडीत कुटुंबियांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नसल्याने आज रिपाई व आदिवासी विकास मंचच्या वतीने फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार तडवी यांना देण्यात आले. यावेळी आठ दिवसात पिडीत कुटुंबाला न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आदिवासी विकास मंचच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी विक्की तायडे एकनाथ गाढे, ईश्वर इंगळे, सलीम तडवी यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यापूर्वी रावेर येथील आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चार भावंडांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत आर्थिक मदत व घर जाहीर केले होते. मात्र अद्याप पर्यंत या कुटुंबास कुठलीही मदत मिळाली नसून या कुटुंबाला न्याय न मिळाल्याने याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आदिवासी विकास मंच त्यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. तसेच नायब तहसिलदार तडवी यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसात पिडीत कुटुंबाला न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आदिवासी विकास मंचच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी विक्की तायडे एकनाथ गाढे, ईश्वर इंगळे, सलीम तडवी यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/831380104346389/

Protected Content