क्रिकेट विश्वातील ऐतिहासिक सामना ; सर्व फलंदाज शून्यावर बाद

88217632 stumps2 bbc

 

मुंबई (वृत्तसंस्था) हॅरिस शिल्ड या मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळविण्यात येणाऱ्या  स्पर्धेत अंधेरीच्या चिल्ड्रेन्स वेल्फेअर या संघातील सर्व फलंदाज चक्क शून्यावर बाद झाले. केवळ अवांतर धावांच्या जोरावर त्यांच्या खात्यात ७ धावांची नोंद झाली.

 

स्वामी विवेकानंद शाळा बोरिवलीविरुद्धच्या या सामन्यात हा धक्कादायक निकाल लागला. चिल्ड्रन वेल्फेअर संघाच्या खात्यात सात धावा आहेत, मात्र या धावा संघातील कुठल्याही फलंदाजाने काढलेल्या नाही, तर विरोधी संघातील गोलंदाजांच्या चुकांमुळे चिल्ड्रन वेल्फेअरला अतिरिक्त सात धावा मिळाल्या. जर चिल्ड्रन वेल्फेअरला अतिरिक्त धावा मिळाल्या नसत्या, तर हा संपूर्ण संघ शून्यावर ऑल आऊट झाला असता. चिल्ड्रन वेल्फेअर शाळेविरोधात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळा होती. या संघाकडून मीडियम पेसर अलोक पालने तीन षटकांत तीन धावा देत सहा विकेट्स घेतल्या. तर कर्णधार वरोद वाजेने तीन धावा देत दोन विकेट्स घेतल्या, इतर दोन फलंदाज रन आऊट झाले.

Protected Content