नाशकात मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन

nashik

 

चाळीसगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ इंदोर अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिर रविवार दि. 8 डिसेंबर रोजी जी शॉपी, चांडक सर्कल, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीरात बसविण्यात येणारा हात हा वजनाने हलका असून या हाताने आपण आपले दैनंदिन जीवनाची कामे अगदी व्यवस्थितपणे करू शकतात. हा कृत्रिम हात बसविण्यासाठी आपणास कोपरापासून पुढे किमान 4 इंच हात असणे आवश्यक आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त गरजू लोकांना हा शिबीराची माहिती देवून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महेश गाडेकर (मो.नं. 94222 57314) रोटे. राजेंद्र धारणकर (मो.नं. 97662 00241) यांच्याशी संपर्क साधावा.

Protected Content