अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचे आयोगाला आदेश

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या देशात निवडणूकीचे वारे वाहत आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा, चार राज्याच्या विधानसभा आणि काही राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणूकाही होणार आहे. अशातच निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही जाहीर केली होती.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांनी २९ वर्षे भाजपचा झेंडा मतदारसंघावर फडकवला होता. मात्र, ३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हापासून या मतदारसंघाची जागा रिक्त होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूकीबरोबरच दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने ही निवडणूक रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या आमदाराला एका वर्षापेक्षा कमी कार्यकाळ मिळत असल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर या याचिकेवर सुनावणी झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही पोटनिवडणूक रद्द करण्याचा आदेश दिला आहे

 

Protected Content