पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या विदर्भ प्रमुखपदी वर्धा जिल्ह्यातील आकाश अशोकराव सुखदेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांच्या हस्ते आज त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, आर्थिक संकट, अवकाळी पावसाचे संकट आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
“मी एक शेतकऱ्याचा पुत्र असून, विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांना हक्काच्या योजना मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे आकाश सुखदेवे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी सांगितले की, “संघटनेचे विचार, धोरणे आणि उद्दिष्टे विदर्भातील प्रत्येक शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आकाश सुखदेवे यांच्यावर आहे.” पुढील कार्यकारणी पंधरवड्यात घोषित करून संघटनेच्या कार्यालयात पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शेतकरी हितासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी 9890875238 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या निवडीबद्दल विदर्भातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकाश सुखदेवे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.