यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गिरीश महाजन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. कुंदन फेगडे यांनी राष्ट्रीय संरक्षण निधीला एकवीस हजारांची मदत केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त बॅनरबाजी व इतरत्र कुठलेही खर्च न करता भारतीय सेनेला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी मदतीचा हात दिला आहे .ना. महाजन यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी जळगाव जिल्ह्यातील आपल्या तमाम पक्षाच्या कार्यक्रत्यांना यंदा जम्मु कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ला व भारताच्या वतीने ऑपरेशन सिन्दुर सुरू असल्या कारणाने जाहीराती व बॅनरबाजी वर खर्च न करता सेवा उपक्रम राबवावे आवाहन केले होते.
या आवाहानास प्रतिसाद देत डॉ. कुंदन फेगडे यांनी सेवा उपक्रम म्हणुन राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी २१ हजार रूपयांची आर्थिक मदत पाठवली असुन त्यांनी सर्व देश वासीयांना यथाशक्ती देशाला मदत करण्याचे आवाहन ही केले आहे. प्रत्येक नागरीकांनी आपल्या आनंदाच्या क्षणी खर्चात कपात करून देशसेवेत मदत करावी व आपल्या देशाचे सैनिकदलाच्या जवानांच्या आरोग्याला आणि शहीद झालेल्या कुटुंबीयांना मदत होइल असे ही डॉ. कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे .