बकालेंवर कठोर कारवाई होणार – अजित पवारांचे आश्वासन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाबद्द्ल अपशब्द बोलणाऱ्या पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले वर बडतर्फची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली.

पाचोरा दौर्‍यावर असलेले अजित पवार यांना एल.सी.बी. चे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजा बद्द्ल अपशब्द बोलल्याबाबत निलंबित कारवाई नंतर चौकशी करून सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी सकल मराठा समाज व मराठा क्रांतीमोर्चा सह अखिल भारतीय मराठा समाजच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी ना. अजित पवार यांनी कठोर कारवाई होणारच असे आश्वासन ना. अजित पवार यांनी दिले. निवेदन देते प्रसंगी मराठा क्रांतीमोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी, अ. भा. मराठा समाज अध्यक्ष डॉ. योगेश पाटील उपस्थित होते. यावेळी “एक मराठा लाख मराठा”, “बकाले बडतर्फ झालेच पाहिजे”, “जय जिजाऊ, जय शिवराय” अशा घोषणांनी महाराणा प्रताप चौक दणाणुन सोडला होता. यावेळी संजय पाटील, राकेश सोनवणे, नितीन पाटील, गणेश पाटील, लकी पाटील, सचिन पाटील, राहुल शिंदे, दिगंबर पाटील, किशोर पाटील, कल्पशे येवले आदी उपस्थित होते.

 

Protected Content