मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील सेन्ट्रल बँक शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, खासदार रक्षाताई खडसे यांनी ही कार्यवाही केली आहे.
तालुक्यातील शेतकरी, व्यापारी इतर ग्राहकांच्या अनेक तक्रारी बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदर समस्या मांडण्याकामी तालुक्यातील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर, अंतुर्ली व कुऱ्हा यांच्या शाखा व्यवस्थापकांची बैठक आयोजित केली असता, मुक्ताईनगर येथील शाखा व्यवस्थापक सुमित कुमार झा हे बैठकीस २ तास उशिरा आले त्यांना खासदार कार्यालय मार्फत २ वेळा निरोप देण्यात आला होता. तसेच त्यांच्या बाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी होत्या, ते बँकेमध्ये हजर राहत नाही, फोन केल्यास साईटवर आहे, असे सांगतात तसेच बैठकीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत घरी झोपले होते.
याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी त्यांना शेतकरी, व्यापारी इतर ग्राहकांच्या तक्रारी बाबत विचारणा केळी असता त्यांनी खासदारांसोबत अपशब्द वापरून बैठकीत गैरवर्तन केले. याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे त्यांची तत्काळ बदली होणे बाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक यांना याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा करून सांगितले तसेच लेखी तक्रार केली असता, आज दुसऱ्याच दिवशी सुमित कुमार झा यांची तडकाफडकी बदली करण्यात येऊन नवीन शाखा व्यवस्थापक गोपाळ पाटील यांना रुजू करण्यात येऊन मुक्ताईनगर शाखेचा पदभार देण्यात आला.