‘एसटी’च्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांचे हात कापले

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या शेतकऱ्याचा हात दंडापासून वेगळा केला. एक युवकही या पत्र्यामुळे आपला हात गमावून बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या या बसने आज सकाळी 6 वाजता आव्हा गावाजवळ तीन जणांना गंभीर जखमी केले. ज्या शेतकऱ्याचा हात कटला तो 45 वर्षीय असून त्याचे नाव परमेश्वर सुरडकर आहे. त्यांना तातडीने मलकापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तर या बसच्या पत्र्याने पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या दोन युवकांनांही जखमी केले. त्यात विकास गजानन पांडे (22 वर्ष) याचा समावेश आहे. त्याचाही हात कटून वेगळा झाला आहे. विकास हा अग्निवीर भरतीची प्रॅक्टिस करत होता. सदर बस (एम एच 40 एन 9121) ही मलकापूर डेपोची आहे. तिचा चालक देवराव भावराव सूर्यवंशी आहे. दरम्यान अपघातानंतर संतप्त जमावाने मलकापूर डेपोत तोडफोड केल्याचे समजते. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शेतकरी आणि युवक दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Protected Content