लडाख सीमेपासून जवळ असलेला हवाई तळ

 

बीजिंग, वृत्तसंस्था ।पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चीनने ही लष्करी चाल करण्याआधी ‘होतान’ एअरबेसवर J-20 ही पाचव्या पिढीची अत्याधुनिक फायटर विमाने पुन्हा तैनात केली. ‘होतान’ हा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा लडाख सीमेपासून जवळ असलेला हवाई तळ आहे.

२९-३० ऑगस्टच्या रात्री पँगाँग टीएसओ तलावाच्या दक्षिण किनाऱ्याजवळ चिनी सैन्याच्या आक्रमक हालचाली दिसून आल्या. त्यानंतर भारतीय सैन्याने तातडीने पावले उचलत चीनचा नव्या भागातील घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

चीनने ‘होतान’ एअर बेसवर J-20 फायटर विमानांची तैनाती केल्यापासून लडाख आणि आसपासच्या प्रदेशातील भारतीय सीमांजवळ या विमानांची उड्डाणे सुरु आहेत. मागच्या महिन्यात काशगर एअर बेसवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने H-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे उपग्रह फोटोंवरुन समोर आले होते.

Protected Content