मध्य प्रदेश : विश्वासदर्शक ठराव उद्याच घ्या; अन्यथा तुमच्याकडे बहुमत नाही असे समजू ; राज्यपालांचे पत्र

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला सभागृहात उद्याच (मंगळवार) विश्वासदर्शक ठराव मांडा. अन्यथा तुमच्याकडे बहुमत नाही, असे गृहीत धरले जाईल, असे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेश विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. परंतू राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी बहुमत चाचणी बाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित केले होते. यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, यानंतर आता राज्यपालांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पाठवलेल्या पत्रात उद्याच बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपालांची भेट घेऊन १०६ आमदारांची ओळख परेड करवून घेतली.

Protected Content