कोरोना राष्ट्रीय आपत्ती : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ४ लाखांची मदत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात ९१ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने शनिवारी या प्राणघातक विषाणूला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत केले आहे. तर देशात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्यास, कुटुंबाला ४ लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

 

कोरोना विषाणूबाबत आता मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. करोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या तसेच करोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्यांनाही ही मदत दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. देशातील सर्व राज्यांमधील सरकारे आता करोनाशी लढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषातून (एसडीआरएफ) मदत मिळवू शकतात असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. भारतात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी १२ मार्चला कर्नाटकात कोरोनामुळे ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Protected Content