घंटानाद आंदोलनात मंदिराच्या गाभाऱ्यात पादत्राणांसह प्रवेश

फैजपूर, प्रतिनिधी । रविवार झालेल्या भाजपच्या घंटानाद आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर पादत्राणे बाहेर न काढता मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याने तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी फैजपुरु शिवसेनेने केली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देश व राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बंद आहेत . हे माहीत असून सुद्धा कोरोना काळात जनजागृती न करता भाजपचे दांभिक पदाधिकारी देवा धर्माचा आधार घेवून कुटील राजकारण खेळण्याचा प्रयत्न करीत आहे.

२९ ऑगष्टरोजी भाजप खासदार श्रीमती रक्षा खडसे , राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव समितीचे डॉ.राजेंद्र फडके , अशोक कांडेलकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आसलेल्या संत मुक्ताई साहेब यांच्या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्याजवळ घंटानाद व शंखनाद आंदोलन केले . हे आंदोलन करीत असताना त्यांनी गाभाऱ्याजवळ चक्क चपला घातलेल्या दिसून येत आहे . यामुळे महाराष्ट्रातील तमाम वारकरी व हिंदू धर्मियात प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे.

राजकीय स्टंटबाजीसाठी हिंदूधर्मियांच्या भावनांशी खेळणाऱ्या या भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल . याची नोंद घ्यावी , असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात फैजपुर व सावदा शहर शिवसेना शहरप्रमुख अमोल निबाळे, नगरसेवक सूरज सींग परदेसी ,राजू कठोके, मनोज भगाळे,गणेश माळी, किरण गुरव, चोलदास कोळी, राकेश करोसिया आदींनी म्हटले आहे . हे निवेदन फैजपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले .

Protected Content