यावल तालुक्यातील अवैध गावठी हातभट्ट्यांवर पोलिसांची धडक कारवाई

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील टेंभी-कुरण व अंजाळे परिसरात यावल पोलीसांनी धाडी टाकून गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केल्या आहेत. पोलीसांच्या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून यावल पोलीसांनी अवैध दारू बनविणारे आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तालुक्यातील टेंभी-कुरण व अंजाळे परीसरात बेकायदेशीर दारूच्या हातभट्टीवर यावल पोलीसांनी कारवाई केली आहे. पोलीसांनी १८०० लिटर दारूचे कच्चे व पक्के रसायन व ६७० गावठी तयार दारू नष्ट केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक ठिकाणी धाडी टाकून विविध ठिकाणी सुरू असलेल्या दारू भट्ट्या उद्ध्वस्त केले अहे. पोलीसांच्या या कारवाईमुळे अवैध मार्गाने गावठी दारून तयार करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

या परीसरात केली कारवाई
शुक्रवारी सायंकाळी टेंभी-कुरण शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून १२०० लीटर कच्चे पक्के रसायन व ५० लीटर तयार दारू मिळून आली. पोलीस पथक पाहताच दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहे. तर आज शनिवारी सकाळी अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रातगावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून गावठी दारू तयार करण्याचे ६०० लीटर कच्चे पक्के रसायन व २० लीटर तयार दारूजप्त केली असून यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content