पेट्रोलपंपजवळ उभ्या २ टँकरमधून डीझेलची चोरी

धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एकलग्न येथील श्रीराम ऑटोमोबाईल पेट्रोलपंप येथे चारचाकीमधून आलेले अज्ञात तीन जणांनी उभ्या दोन टँकरमधून ४० हजार रूपये किंमतीचे ४४० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक असे की, गणेश श्रीराम पाटील (वय-६४) रा. गणपती नगर, जळगाव हे आपल्यापरिवारासह वास्तव्याला त्यांचे धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथे श्रीराम ऑटोमोबाईल नावाचे पेट्रोलपंप आहे. शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात तीन जण एका कारमध्ये आले. त्यांनी पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरमधून ४० हजार रूपये किंमतीचे ४४० लीटर डिझेल चोरी केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पेट्रोलपंपाचे मालक श्रीराम पाटील यांनी धरणगाव पोलीसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.

Protected Content