अमृता फडणवीस यांनी गोस्वामींच्या अटकेला दर्शवला विरोध

मुंबई वृत्तसंस्था । ‘बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा ‘ असे हिंदीत ट्विट करत अमृता फडणवीस यांनी अर्णब गोस्वामींच्या अटकेला विरोध दर्शवला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांकडून अटक होताच आरोप प्रत्यारोपांच्या फैरू झडू लागल्या आहेत. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. ‘बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा ‘ असे हिंदीत ट्विट करत अमृता फडणवीस यांनी अर्णब गोस्वामींच्या अटकेला विरोध दर्शवला. यासोबत त्यांनी अर्णब गोस्वामी आणि डेथ ऑफ डेमोक्रेसी हे हॅशटॅगही दिले आहेत.

तसेच, आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. अशा आशयाचे असलेले देवेंद्र फडणवीसांचे ट्विटदेखील अमृता फडणवीस यांनी रिट्विट केले आहे.

Protected Content