पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री ते फ्रान्सची राजधानी पॅरीसला पोहचले. तिथे त्यांचे जोरदार स्वागत झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एआय समिटमध्ये भाषण केले. तसंच द्वीपक्षीय चर्चाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्सिलो या ऐतिहासिक शहराचाही दौरा करणार आहेत. एआय समिटला संबोधित करताना मोदी म्हणाले, “आज एआय ही काळाची गरज आहे. आमच्याकडे जगातलं सर्वात मोठे टॅलेंट आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. आमचं सरकार खासगी सेक्टर्सच्या मदतीने पुढे वाटचाल करतं एआयचे भविष्य खूपच चांगले आहे आणि एआय मुळे सगळ्यांचं हित होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांत पुढे म्हणाले, एआय कोड फॉर ह्युमॅनिटी लिहितो आहे. एआय मुळे लाखो आयुष्यं बदलणार आहेत. काळ बदलतो आहे त्याचप्रमाणे रोजगारांचं स्वरुपही बदलतं आहे. कायमच चर्चा होतात की एआय मुळे रोजगाराचं संकट निर्माण होऊ शकतं. पण इतिहास आपल्याला हेच सांगतो की कुठलंही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही. एआयमुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एआय आपल्या समाज, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या आघाड्यांना सकारात्मक पद्धतीने बदलतो आहे. एआय बाबत काही जोखमीचे मुद्दे आहेत. त्यावर विचारमंथन झालं पाहिजे आणि चर्चा केला पाहिजे असंही मोदींनी सुचवलं आहे. एआय च्य पॅरीसमधल्या परिषदेत १०० देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की AI मध्ये हजारो आयुष्यं बदलण्याची ताकद आहे. समाज आणि सुरक्षा या दोन घटकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आवश्यकता आहे, असं मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे इमॅन्युअल मॅक्रो यांचे त्यांनी आभारही मानले. एआय चा विकास हा वेगाने होतो आहे. डेटा गोपनीयता हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.