इच्छुकांनी आघाडीत येण्याचा निर्णय आजच घ्या; आघाडीच्या सुचना

ncp

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसची आघाडी होत असल्याने विधानसभा निवडणूक लढण्यास शिवसेना व भाजपमधील इच्छुकांनी चाचपणी सुरू केली असली तरी भाजपा आणि शिवसेना यांची युती घोषित होत नसल्याने या इच्छुक उमेदवारांची मनस्थिती तळ्यात मळ्यात अशीच आहे. आजचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी आपला काय तो अंतिम निर्णय घ्या, अश्या सुचना आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे.

आमदार धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर गेले काही दिवस इच्छुकांच्या मुलाखती सुरू असून या ठिकाणी शिवसेनेतील व भाजपमधील अनेक नेते व कार्यकर्त्यांची ये-जा वाढली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्याही मागे या इच्छुकांपैकी अनेकजणांनी तिकिटासाठी गेले काही दिवस ताडकत ठेवले आहे. मात्र युतीची घोषणा लांबत असल्याचे पाहून अनेक उमेदवरांनी आपली स्पष्ट केलेली नाही. शिवसेना व भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज गेले आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची गेली काही वर्षे तयारी केली होती. त्यांच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेला नेत्यांचा लोंढा पाहून नाराजीचा सूर उमटू लागला होता. काँग्रेस राष्ट्रवादीमधून आलेल्या या नेत्यांसाठी अंथरला जाणारा लाल गालिचा पाहून त्यातील बहुतांश नेत्यांना निवडणुकीची उमेदवारी मिळणार असल्याचे सेना भाजपमधील कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चाचपणी सुरू केली होती. मात्र निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊनही युतीच्या बाजूने कोणतीही घोषणा होत नसल्याने या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. युती न झाल्यास सेना व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये तिकीट मिळण्याच्या संधी अधिक उपलब्ध होऊ शकतात. एखाद्या मतदारसंघात काँग्रेस वा राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्याला तिकीट मिळणार असेल, तर त्याच्या शेजारील मतदारसंघातून तरी इच्छुकाला लढण्याची संधी युती न झाल्यास मिळू शकते. त्यामुळे युतीची घोषणा लांबल्याने या इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.

Protected Content