भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात अन्नदान व केळीचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी तुषार वाढे (तालुका अध्यक्ष), दिपक सोनवणे (तालुका अध्यक्ष वाहतूक सेना), दशरथ सपकाळे, विलास कोळी, प्रणय भागवत, कुणाल वारके, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अहमदनगर येथील कुटुंबाचे प्रवासात पैसे चोरीला गेल्यामुळे त्यांच्या जवळ जेवायला व घरी जाण्यासाठी पैसै नव्हते, म्हणून त्यांना आर्थिक मदत व जेवायला देण्यात आले.