मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवाशी पत्रकार किरण वसंतराव पाटील यांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आदर्श पत्रकार पुरस्कार किरण पाटील यांना मिळाला.
या पुरस्काराचे वितरण 29 सप्टेंबर 2024 रोजी रविवारी मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार किरण पाटील यांना भारताची पहिली महिला सर्पमित्र वनिताताई बोराडे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व गुलाब बुके देऊन किरण पाटील यांना सन्मानित करण्यात आले. या अगोदर किरण पाटील यांना योगराज कंट्रक्शन मुक्ताईनगर तर्फे उल्लेखनीय कामगिरीबद्दल ट्रॉफी देण्यात आली होती. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे किरण पाटील यांना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याने किरण पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.