जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोळी समाज विकास मंडळ भुसावळ येथे आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी कोळी समाजातील दहावी,बारावी, पदवी, इतर शैक्षणिक आणि खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाज विकास मंडळाची ट्रॉफी, शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी समाजातील २१० विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.डॉक्टर दिवाकर पाटील होते. यावेळी त्यांनी आगामी काळात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळे मार्गदर्शक मेळावे घेण्याचे सांगितले तसेच विविध आरोग्य शिबिर घेण्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती अश्विनी कोळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श ग्रामविकास अधिकारी सोपान घनश्याम सपकाळे ,श्री विनोद सोनवणे आदर्श ग्रामसेवक, रंजना सुपडू कोळी (शिक्षिका) यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर अप्पा सोनवणे, विश्वनाथ तायडे, पिंप्रीकर गुरुजी, शरदचंद्र पवार, रवींद्र पवार, वसंत हरचंद सपकाळे, पन्नालाल सोनवणे, जितेंद्र सपकाळे, प्रकाश कोळी,उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरण्याचे व उच्च ध्येय ठेवावे यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करावा असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे दत्तात्रय सपकाळे, प्रदीप सपकाळे ,कैलास सोनवणे, दीपक सोनवणे, विजय तावडे, भागवत सपकाळे, वसंत सपकाळे, रवींद्र बाविस्कर, सोपान पवार, संदीप कोळी, पिंपरीकर गुरुजी, शांताराम दगडू कोळी, नारायण कोळी, उत्तम कोळी, आनंदा दोडे, अशोक सोनवणे, धर्मराज कोळी, महारु कोळी, नारायण भोलांणकर, गोकुळ सपकाळे, शशिकांत सपकाळे, तसेच मंडळाच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती संजीवनी भोलाणकर, सरोज सपकाळे, सुकेषा बाविस्कर, सुनंदा सपकाळे, विद्या बाविस्कर, सुरेखा सोनवणे, सीमा सूर्यवंशी, वंदना कोळी, तावडे ताई, उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत सूर्यवंशी वर आभार प्रदर्शन श्री दीपक सोनवणे यांनी केले.