दुचाकीच्या धडकेत प्रौढ गंभीर जखमी; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय आयटीआय बसस्थानकाजवळ उभा असलेल्या एका प्रौढ व्यक्तीला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवार १८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय किसन काकडील (वय-४२, रा. साई शंकर, कॉलनी वाघ नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १७ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दत्तात्रय काकडील हे महामार्गावरील शासकीय आयटीआय बस स्थानकाजवळ जात असताना एक किरकोळ अपघात झाला होता. तो अपघात पाहण्यासाठी दत्तात्रय काकडील हे थांबले होते. त्यावेळी त्यांना मागून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजी ३५३७) वरील अज्ञात चालकाने मागून जोरदार धडक दिली. या अपघतात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दत्तात्रय काकडील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी १८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

Protected Content