सुफी हजरत खाँजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निवेदकावर गुन्हा दाखलची मागणी

जळगाव प्रतिनिधी । सुप्रसिध्द सुफी हजरत खॉजा गरीब नवाज यांच्याबद्दल चुकीची माहिती प्रसिध्द करणाऱ्या एका प्रसारमाध्यमाच्या निवेदक यांच्यावर गुन्हा दाखल करून सदरील चॅनल बंद करण्याची मागणी शहरातील माजी उपमहापौरांसह प्रतिष्ठीत नागरिकांनी केली आहे. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमिश देवगन यांनी ‘डीबेट शो’मध्ये हजरत चिश्ती यांना ‘अतिरेक चिश्ती व लुटेरे चिश्ती’ असे आक्षेपार्ह्य विधान केले. यामुळे सर्वत्र असंतोषाची लाट पसरली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे निवेदक देवगन यांना अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी उपमहापौर करीम सालार, राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, अजिज सालार, अनवर खान शिकलकर, मोहम्मद अस्‍फाक मिर्झा, खलील पठाण, फरीद खान, मोहम्मद फारूख , फिरोज शेख हुसेन, एजाज अहमद, जावेद खान, मोहंमद मलिक आदींनी केली आहे.

Protected Content