जि. प.च्या प्रत्येक शाळांना संरक्षण भिंत देऊन स्वच्छता व विद्यार्थी हितासाठी कटीबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत असेल तर स्वच्छता राखण्यासाठी मदत होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वयक्तिक व गाव, शहराच्या स्वच्छतेचे महत्त्व सगळ्यांना पटले आहे. त्यामुळे *”पालकमंत्री संरक्षण भिंत योजनेच्या” माध्यमातून जिल्ह्यातील सर्व 925 शाळासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असुन पहिल्या टप्प्यात 300 शाळेचे काम हाती घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु. जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

 

पुढे बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांना वॉल कंपाउंड साठी निधीची कमतरता भासू देणार नसून येत्या वर्षभरात 3 टप्प्यात 925 शाळांना मनरेगा डीपीडीसी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करून काम पूर्ण करणार असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शासन स्थरावर विविध योजना राबवल्या जातात. अनेकवेळा एकाच प्रकारच्या कामासाठी विविध योजनांद्वारे वित्त पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्मिती विविध विभागाच्या योजनांचे अभिसरण मनरेगा योजनशी करण्याचे धोरण 5 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयांवये निश्चीत करण्यात आले होते. त्यानुसार मनरेगा अन्तर्गत 260 कामे करता येतात. या कामांपैकी 28 कामांचा विविध विभागाच्या योजनांसोबत अभिसरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यंत्र सामग्रीचा वापर न करता ही कामे करावयाची असुन अधिकाधिक ग्रामीण कुशल व अकुशल मजुरांना रोजगार दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील शासकीय जागेवरिल वाढते अतिक्रमण, शालेय भौतिक सुविधांचे रक्षण (जसे शौचालय डिजिटल वर्ग खोल्या; सौर पेनल) समतल खेळांची मैदाने, समृध्ह वृक्षवल्ली व विद्यार्थ्यांमधे सुरक्षिततेची भावना बळावण्यासाठी सरक्षण भिंतीचे महत्व वादादित आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील 925 जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षण भिंतीची आवश्यकता असून त्यासाठी साधारण 150 कोटीं निधीची आवश्यकता आहे. सदरचे काम 3 टप्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात 50 कोटित साधारणतः 300 शाळा सुरक्षित करण्यात येणार आहेत. त्यात योजनांच्या अभिसरनांवये मनरेगा 27 कोटी,जिल्हा नियोजनातुन 14 कोटी व चौदाव्या वित्त आयोगातुन 9 कोटी खर्च होणार आहे. सदर कामांमुळे 9 लाख मनुष्य दिन निर्माण होणार असून 9 हजार लोकांना शंभर दिवस कांम मिळनार आहे. त्यासाठी निव्वळ मजुरीवर 16 कोटी खर्च होणार आहे.

 

“पालकमंत्री सुरक्षित शाळायोजनेंतर्गत” सरक्षण भिंती बरोबर वृक्ष लागवड, डिजिटल क्लास रुम, सौर शाळा मॉडेल स्कूल अशा योजना ही राबविल्या जाणार आहेत. आज रोजी जिल्यातील 14 तालुक्यामधे 75 शाळांच्या संरक्षण भिंतीची कामे चालू करण्यात असुन ऑक्टोबर 2020 अखेर पहिला टप्पा पूर्ण करणे अपेक्षीत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.एस. अकलाडे यांनी मानले तर ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. यावेळी सदर कार्यक्रमाप्रसंगी जि.प.चे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.एस. अकलाडे, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे,उपसभापती शारदा प्रेमराज पाटील, सरपंच मंदाबाई प्रकाश पाटील, उपसरपंच संजय पाटील,ग्रा. पं. सदस्य पुष्‍पाबाई पाटील ग्रामसेवक सी. एच. देवरे, सुभाष पाटील, श्री जगताप यांच्यासह ग्रामस्थ परिसरातील सरपंच उपस्थित होते.

Protected Content