गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

ganpati visarjan

मुंबई प्रतिनिधी । अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या मुक्कामी आलेल्या घरगुती व सार्वजनिक गणपतींचे उद्या विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार, मुंबई महापालिका, पोलिस व इतर सरकारी यंत्रणा, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती तसेच गणेशोत्सव मंडळे लाडक्या बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न व्हावे, यासाठी सज्ज झाली आहेत.

विसर्जनासाठी गिरगाव, दादर, माहीम, जुहू चौपाटीसह ६९ ठिकाणे नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. तर कृत्रिम तलावांची व्यवस्था पुढील ३२ ठिकाणी करण्यात आली आहे. जसे स्वान मिल मनोरंजन मैदान (शिवडी), अशोक पिसाळ मैदान (प्रतीक्षा नगर, शीव), खेड गल्ली (प्रभादेवी, दादर), महापौर निवास (शिवाजी पार्क, दादर), महात्मा गांधी विद्यालय (वांद्रे शासकीय वसाहत), संभाजी गार्डन (सांताक्रूझ पश्चिम), गजधर पार्क (सांताक्रूझ पश्चिम), डॉ. हेडगेवार मैदान (अंधेरी पूर्व), लोखंडवाला संकुल (अंधेरी पश्चिम), डॉ. बळीराम हेडगेवार मैदान (घाटकोपर पश्चिम), दत्ताजी साळवी मैदान (घाटकोपर पूर्व), पांडुरंग वाडी (गोरेगाव पूर्व), गणेश घाट (गोरेगाव पूर्व), रामलीला मैदान (मालाड पूर्व), बुवा साळवी मैदान (मालाड पूर्व), देसाई तलाव (मालाड पूर्व), आकृती महापालिका चौकी (कांदिवली पूर्व), ठाकूर व्हिलेज (कांदिवली पूर्व), लोखंडवाला तलाव (कांदिवली पूर्व), दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन (दहिसर), अशोकवन महापालिका उद्यान (दहिसर पश्चिम), तावडेवाडी (दहिसर पश्चिम), अनंतराव भोसले क्रीडांगण (बोरिवली पश्चिम), स्वप्ननगरी तलाव (बोरिवली पश्चिम), कुलुपवाडी खेळाचे मैदाने (बोरिवली) असे ठिकाण असणार आहेत.

Protected Content