केंद्रीय मंत्री अरविंद सावंतांचा राजीनामा; ट्विटवरून दिली माहिती

arvind sawant

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

राज्यात शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रीत केले आहे. अर्थात, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा पाठींबा मिळवण्यासाठी शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे अशी मागणी समोर आली होती. या अनुषंगाने केंद्रीय अवजड उद्योग मंत्र अरविंद सावंत हे राजीनामा देणार असल्याचे संकेत काल रात्रीच मिळाले होते. यावर आज शिक्कामोर्तब झाले असून आज सकाळी एका ट्विटच्या माध्यामतून खुद्द सावंत यांनी आपण राजीनामा देत असल्याची माहिती दिली. शिवसेनेची बाजू सत्याची असून अशा खोट्या वातावरणात दिल्लीत का रहावे ? असा प्रश्‍न उपस्थित करून आपण केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीदेखील सामंत यांनी या ट्विटमध्ये दिली आहे.

Protected Content