मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे नायगाव कोठे ग्रुप ग्रामपंचायत येथील तत्कालीन कार्यरत असलेले ग्रामसेवक भारत भूषण सुखदेव इंगळे यांना दिनांक 23 सप्टेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत तत्कालीन कार्यरत नायगाव ग्रुप ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक भारत भूषण सुखदेव इंगळे यांना 2018-19 या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच शासकीय कामकाज काटेकोरपणे अंमलात आणणे, ग्रामपंचायतीच्या विकासकामांत महत्त्वाची भूमिका बजावणे यासाठी दिला जातो. भारतभूषण इंगळे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करताना उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे गावातील विविध योजनांचे योग्य आणि वेळेवर अंमलबजावणी झाली आहे.
गावकऱ्यांमध्ये त्यांच्या कामाची प्रशंसा होत आहे.पुरस्कार प्रदान सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.