कामात दिरंगाई भोवली आदर्श ग्रामसेवक निलंबित

अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले यांना ग्रामपंचायत देवगांव – देवळी येथे ग्रामपंचायत कामांत दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याने शामकांत पाटील यांच्या तक्रारीने निलंबित करण्यात आले आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, कैलास रामभाऊ देसले ,ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत जानवे पंचायत समिती अमळनेर हे ग्रामपंचायत देवगाव-देवळी येथे कार्यरत असतांना सन २००३,२००४,२००५,२००९,व २०१०,ते २०१४ या कालावधीत ग्रामपंचायत देवगाव-देवळी येथील मासिक सभा, ग्रामसभा, कोरम पूर्ण नसतांना सभा तहकूब न करता इतिवृत्त नोंदवहीत लिहिणे, मासिक सभेच्या इतिवृत्त नोंदवहीत सदस्यांच्या सह्या घेवून इतिवृत्त न लिहिणे, ग्रामसभांचे कोरम पूर्ण नसतांना सभा तहकूब न करता इतिवृत्त लिहिणे असे कामकाज केले. ग्रामसभेत विविध योजनांच्या वार्षिक जमा खर्चास मंजूरी न देणे अशी गंभीर अनियमितता केल्याचे आढळून आले.

यावरून त्यांनी ग्रामपंचायत कामकाजात दिरंगाई तसेच हलगर्जीपणा केला असल्याचे म्हणत या सर्व प्रकरणावर गटविकास अधिकारी चौधरी यांना पंचायत समिती अमळनेर सेवेतून निलंबित केले असून त्यांचे निलंबन मुख्यालय बाबत तसेच दोषारोप पत्र १ ते ४ भरून सादर करण्यात आलं असल्याचं आदेशात नमूद केलं आहे. ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले यांना देवगांव देवळी येथेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला असल्याने शासनाच्या कामकाजाबाबत देखील तक्रारदार शामकांत पाटील यांनी जिल्हा परिषद जळगांव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!