सातारा । चित्रपट, रंगभूमी आणि मालिकांमधील ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज निधन झाले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण झाल्याचे अलीकडेच निष्पन्न झाले होते. काळूबाईच्या नावानं चांगभलं मालिकेचे चित्रीकरण करतांना त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. या मालिकेच्या सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती यात आशालता वाबगावकर यांचाही समोवेश होता. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली गेली. यामुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.