गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये गुंगीकारक गांजाचा चिलमद्वारे नशा करणाऱ्या एका तरुणावर रामानंदनगर पोलिसांनी रविवारी २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे चिलममध्ये गांजा भरून नशा करत असताना संशयित आरोपी जुनेद शेख साबीर रा. पिंप्राळा हुडको ता. जळगाव याच्यावर रामानंदनगर पोलिसांनी रविवारी २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई केली आहे. त्याच्याकडून नशा करण्याचे साहित्य जप्त केले असून याप्रकरणी पोलीस शिपाई उमेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content